नकारात्मक गुगल रिव्ह्यू कसे हाताळायचे:

प्रथम, तुम्ही काहीही करत असला तरी घाबरू नका. जेंव्हा जेंव्हा माझ्या क्लायंटला नकारात्मक गुगल रिव्ह्यू मिळतात तेंव्हा ते त्वरित मला कॉल करून विचारतात की मी त्यांना ते काढून टाकण्यास मदत करू शकेन का? कारण ते चिंताग्रस्त असतात की नकारात्मक गुगल रिव्ह्यू त्यांच्या व्यवसायावर वाईट प्रभाव टाकेल. गुगल व्यवसाय सूचीमध्ये 5 पैकी 5-स्टार रेटिंग असणाऱ्या व्यवसायासाठी हे अगदी खरे आहे.

प्रथम मी त्यांना सांगतो की मी त्यांच्या सूचीतून किंवा इतर कोणाच्या सूचीतून नकारात्मक गुगल रिव्ह्यू हटविण्यात मदत करू शकत नाही. खरं तर, ज्याने ते पोस्ट केले आहे त्याशिवाय कोणीही करू शकत नाही. त्यामुळे जोपर्यंत तुम्ही मूळ समीक्षकाला रिव्ह्यू काढून टाकण्यासाठी तयार करत नाही तोपर्यंत ते रिव्ह्यू दिसत राहतील.

दुसरी गोष्ट मी त्यांना सांगतो की नकारात्मक रिव्ह्यूमुळे त्यांचे सरासरी रेटिंग कमी होण्याची शक्यता आहे जी चांगली बाब आहे कारण, संशोधन असे दर्शविते की ज्या व्यवसायांना सातत्याने 5 पैकी 4.5 स्टार रेटिंग मिळतात ते सातत्याने 5 स्टार रेटिंग मिळणाऱ्या व्यवसायांपेक्षा चांगली कामगिरी करतात. याचा अर्थ असा नाही की लोक त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांपेक्षा वाईट कामगिरी करणाऱ्या व्यवसायांशी व्यवहार करू इच्छितात. ग्राहकांना अधिप्रमाणित आणि विश्वासार्ह व्यवसायांशी व्यवहार करणे आवडते आणि त्यांच्यात काही त्रुटी असतील अशी त्यांची मानसिक तयारी असते.

5 पैकी 5-स्टार रेटिंग अनेकदा बनावटी किंवा खोटी म्हणून समोर येतात. म्हणून जर तुम्हाला तुमचे पहिले नकारात्मक रिव्ह्यू मिळाले असेल तर हताश होऊ नका, त्याऐवजी ते साजरे करा आणि पुढील मार्गदर्शक तत्त्वांचे अनुसरण करा.

नकारात्मक गुगल रिव्ह्यूला उत्तर देणे:

तुम्ही रिव्ह्यूला व्यावसायिक पद्धतीने उत्तर देत असल्याची खात्री करा. हे एखाद्या परिचित ग्राहकाने किंवा अनोळखी व्यक्तीने पोस्ट केले असले तरीही तुम्ही सर्व रिव्ह्यूला प्रतिसाद देणे महत्त्वाचे आहे, विशेषत: नकारात्मक. लक्षात ठेवा, तुम्ही असमाधानी ग्राहकांना कसे हाताळता हे संभाव्य ग्राहक बघत असतो.

तुम्हाला कोठून सुरुवात करावी हे माहित नसल्यास मी तुम्हाला gatherup.com नावाच्या साईट वर तज्ञांकडून लिहलेला लेख वाचण्याची शिफारस करतो जिथे ते तुम्हाला पुढील गोष्टी करण्याची सल्ला देतात:

  • रिव्ह्यू प्राप्त झाल्यानंतर एका दिवसात प्रतिसाद द्या
  • तुमचे उत्तर वैयक्तिकृत करण्यासाठी ग्राहकाचे स्वतःचे शब्द वापरा
  • त्यांना आलेल्या समस्येचे निराकरण करा

नकारात्मक रिव्ह्यूला सर्वोत्तम प्रत्युत्तर कसे द्यायचे यावरील संरचित दृष्टीकोन देखील हे तज्ञ देतात. परंतु जर तुम्ही माझ्यासारखे आळशी असाल तर मी सल्ला देईन की तुम्ही त्यांचे रिव्ह्यू प्रत्युत्तर नमुने डाउनलोड करा. प्रत्युत्तर प्रक्रियेला गती देण्यासाठी तुम्ही ते वापरू शकता. माझ्या मते ते फायदेशीर आहेत आणि विशेषत: ते पूर्णपणे विनामूल्य आहेत.

एकदा तुम्ही रिव्ह्यूला उत्तर दिल्यानंतर तुम्ही पुढील गोष्टी करण्याचा विचार करू शकता.

गुगल ला रिव्ह्यू काढून टाकण्याबद्दल विचारणे:

बर्‍याच व्यवसाय मालकांना वाटते की त्यांना मिळालेली नकारात्मक रिव्ह्यू अयोग्य आहेत आणि ती काढून टाकण्यासाठी ते उतावळे असतात.

चांगली बातमी अशी आहे की, गुगल एक पर्याय प्रदान करते ज्या माध्यमातून तुम्ही विशिष्ट रिव्ह्यू काढण्याची विनंती करू शकता.

तुम्हाला फक्त तुमच्या गुगल सूचीशी संबंधित गुगल खात्यात लॉग इन करण्याची आवश्यकता आहे, “Request review removal” बटणावर क्लिक करा आणि त्यानंतर तुमच्या खात्याच्या तपशीलांची आणि तुमच्या सूचीची पुष्टी करा. “Report a new review for removal” पर्याय निवडा त्यानंतर तुम्हाला अहवाल द्यायचा असलेले रिव्ह्यू निवडा. त्यानंतर तुम्हाला हे रिव्ह्यू का काढले जावे असे वाटते याचे कारण निवडावे लागेल. सबमिट केल्यावर गुगल ते तपासेल आणि रिव्ह्यू काढले गेले आहे की नाही हे तुम्हाला कळवेल.

दुर्दैवाने, बहुतांश प्रकरणांमध्ये, तुमची विनंती नाकारली जाईल. जोपर्यंत ते सूचीबद्ध केलेल्या श्रेणींपैकी एकाच्या अचूक निकषांमध्ये बसत नाही तोपर्यंत रिव्ह्यू काढले जात नाही. जर तुम्हाला वाटत असेल की हे प्रयत्न करणे योग्य आहे, तर या प्रक्रियेतून जा परंतु नकारात्मक रिव्ह्यू तसाच राहण्याची शक्यता जास्त आहे.

त्यात समस्या अशी आहे की जर तुमच्या सूचीवर पोस्ट केलेले नकारात्मक रिव्ह्यू सर्वात नवीनतम असतील तर जेंव्हा संभाव्य ग्राहक तुमच्या ग्राहकांनी पोस्ट केलेल्या सध्याच्या टिप्पण्या बघतील तेंव्हा ते रिव्ह्यू शीर्षस्थानी “नवीन” लेबलसह दिसेल.

त्यामुळे जोपर्यंत तुम्हाला बरीच रिव्ह्यू मिळत नाहीत तोपर्यंत ते नकारात्मक रिव्ह्यू काही काळ तिथेच राहून संभाव्य ग्राहकांना परावृत्त करण्याची शक्यता असते, परिणामी व्यवसायाचे नुकसान होते.

परंतु एक सोपी युक्ती आहे ज्याचा वापर करून तुम्ही तो रिव्ह्यू सूचीमध्ये लवकर खाली करू शकता.

एका सोप्या युक्तीने नकारात्मक गुगल रिव्ह्यूला नजरेआड करणे:

तुमच्या विद्यमान ग्राहकातील एक किंवा दोन ग्राहक ज्यांनी 5-स्टार रिव्ह्यू पोस्ट केले आहे त्यांना विचारा की ते रिव्ह्यू मध्ये काही शब्द जोडून ते अपडेट करू शकतात का ?

रिव्ह्यू किती जुनी आहेत हे महत्त्वाचे नाही. तुम्ही काही चांगल्या मित्रांना किंवा कुटुंबातील सदस्यांनाही विचारू शकता. मला खात्री आहे की त्यांनी काही वर्षांपूर्वी तुम्ही पहिल्यांदा तुमची सूची प्रकाशित केली होती तेव्हा तुमच्या सूचीचे सकारात्मक रिव्ह्यू दिले असतील. त्यांना रिव्ह्यू अपडेट करण्यास हरकत नसावी. ही रिव्ह्यू अगदी नवीन असल्यासारखे मानले जातील आणि रिव्ह्यू सूचीच्या शीर्षस्थानी त्वरित दिसतील आणि नकारात्मक रिव्ह्यू खाली ढकलून नजरेआड करतील.

यामुळे तुमची सूची चांगली दिसेल आणि कोणताही संभाव्य हानीकारक प्रभाव कमी होईल.

Loading