Project Description
आर्थिक मंदी, जागतिक महामारी इत्यादींमुळे मानवजातीपुढे आर्थिक विषमतेचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. मानवजातीचीच एकूण आर्थिक, मानसिक घडी बिघडून गेलेली आहे. अशा परिस्थितीत आवश्यक मनुष्यबळ, रोजगार समस्या यांची सांगड घालणे गरजेचे आहे. व्यावसायिक उद्योजक आणि कर्मचारी या घटकांना पूरक स्थिती प्राप्त झालेस बाजारपेठा आर्थिक वेग पकडतील. कुशल मनुष्यबळ, योग्य संस्था यांची निवड म्हणूनच महत्त्वपूर्ण आहे. वेळ कमी आणि अमुल्य आहे. कोल्हापूर जॉब्ज् हे वेबपोर्टल कंपनी आणि कर्मचारी यांची गरज पूर्ण करु पाहतेय, हा एक व्यावसायिक संदेश इथे आम्ही देत आहोत.
कोल्हापुरातील एक अग्रगण्य वेबसाईट निर्मिती करणाऱ्या अग्निज् डिझायनर्स या संस्थेने सदरची रोजगार संधी निर्माण करुन देणारी वेबसाईट तयार केली आहे, या ऑनलाईन संधीचा फायदा घ्यावा.