Project Description

स्त्री म्हणजे आदिशक्ती..आपली माता..भगिनी..कन्या..पत्नी ही त्याच आदिशक्तीची लघुरुपे या सर्व लघुरुपी आदिशक्तीची प्रमुख देवता म्हणजे श्री महालक्ष्मी करवीर क्षेत्री आपल्या अक्षय्य वास्तवाने भुक्ती आणि मुक्ती प्रदान करणारी जागृत देवता. याच देवतेच्या दर्शनाची आस मनी बाळगून हिंदुस्थानच्या काना कोपर्‍यातुन अक्षरशा लक्षावधी भक्तगण इथे करवीर नगरीत येतात. इथे दर्शनासाठी रांग असेल रांग पैसे मोजुन पटकन दर्शनाची अयोग्य प्रथा नाही. इथे भक्तांची कसलीही अडवणूक नाही. मातेच्या तेजस्वी दर्शनाने भाविकांची मने तृप्त तृप्त होऊन जातात.

अन्य काही धर्मस्थळाप्रमाणे इथे भाविकांच्या माध्यान्ह समयीच्या भोजनाची सोय नसल्याने मन जरी तृप्त झाले असले तरी उदर शांतीसाठी त्यांची पावले मग भोजनालयांचा शोध घ्यायची. ही गरज नेमकेपणाने जाणून घेऊन सर्वात प्रथम आठवड्यामधील दोन दिवस भुकेल्या भाविकांच्या मुखी प्रसादरुपाने अन्न पडावे या हेतूतून मोङ्गत अन्नछत्राची कल्पना अनेक मान्यवरांच्या सदिच्छा आणि पाठबळाच्या जोरावर साकारण्यात आम्ही यशस्वी ठरलो.

भाविकांचा प्रतिसाद लाभला पण आता हेच अन्नछत्र दररोज सुरु रहावे असा आग्रह परगावच्या भाविकांकडून सुरु झाला. ही काळाची गरज आहे हे ओळखून आम्ही दैनंदिन अन्नछत्राच्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकले. कल्पना रास्त होती. योजना चांगलीच होती पण हे सतीचे वाण होते. ते आम्ही श्री महालक्ष्मी (अंबाबाई) च्या आशिर्वादाने आणि सामाजिक बांधिलकी जपणार्‍या करवीरकरांच्या पाठिंब्यावर स्विकारले आणि लवकरच ही योजना ङ्गलद्रुप झाली.

 

लाडू प्रसाद विक्री शुभारंभ

श्री तिरुपती बालाजींच्या दर्शनासाठी जाऊन परतलेल्या भाविकाकडे प्रसाद म्हणून लाडू ध्यावा ही मागणी होताना आपण नेहमीच पाहत आलो आहोत. प्रसादाच्या पदार्थांपेक्षा त्याच्या प्रसाद रुपाचे आकर्षण म्हणूनच वाटत आलेले असते. रोजचाच शिरा पण तो जेव्हा सत्यनारायणाचा प्रसाद म्हणून हातावर पडतो तेव्हा त्याची चव अविट बनलेली असते. हे सर्व जरी पदार्थ असले तरी गायीच्या शुद्ध तुपात बनवलेले लाडू प्रसाद म्हणून श्री महालक्ष्मीच्या दर्शनास येणार्‍या भाविकांना मिळावेत अशी मागणी सुरु झाली. अन्नदानाची कल्पना नि:स्वार्थपणे राबवली जात असल्याचे पाहून मागणीस आणखीनच उत्तेजन लाभले.

म्हणूनच दर्जात कोणतीही तडजोड न करता ‘ना नङ्गा ना तोटा’ या तत्तावर असा प्रसाद उपलब्ध करुन देण्याची योजना संस्थेने कार्यान्वित केली. संत गाडगेबाबा चौकात संपन्न झालेल्या या मधुर समारंभाच्या उदघाटक होत्या करवीरच्या महापौर मा. सौ. प्रतिभाताई नाईकनवरे, कोल्हापूर महानगरपालिकेचे स्थायी समिती सभापती मा. श्री. रमेश पोवार, श्री. आर. के. पोवार, नगरसेवक श्री. संभाजी जाधव, नगरसेवक श्री. आर. डी. पाटील, संस्थेचे सर्व पदाधिकारी, संचालक सेवक वर्ग आणि इतर मान्यवर या समारंभाला आवर्जून उपस्थित होते. लाडू प्रसादाचा दर्जा पाहून सर्वच भक्तांनी समाधान व्यक्त केले.