Project Description

मानव समाजप्रिय आहे.समाज मानवाच्या असंख्य गरजा पूर्ण करतो.ज्यामध्ये शारीरिक,आर्थिक,धार्मिक,सामाजिक बाबींचा पण समावेश होतो.म्हणजे समाजाशिवाय राहणे व्यक्तीस अशक्यच असते.या समाजाचे सातत्य टिकविणारी पारंपारीक समाजमान्य,धर्ममान्य संस्था म्हणजे विवाह संस्था.ह्या संस्थेचे स्वरूप काळाप्रमाने बदलत गेले. ऋग्वेद काळापासून रामायण काळापर्यंत आणि त्यानंतर आजपर्यंत अनेक प्रकारच्या विवाह पध्दती समाजाच्या गरजेप्रमाने निर्माण झाल्या,ज्यामध्ये एकपती-एकपत्नी,बहुपती-बहुपत्नी,समूह-विवाह असे प्रकारे झाले,पण आजमात्र एक पती-पत्नी ही पध्दत सर्वमान्य झाल्याचे दिसते.

भारतामध्ये विवाह संस्थेला धर्माची बैठक आहे.शरीर,मन,आत्मा,आचार-विचार या सर्वांचे दोन जीवातील मिलन म्हणजे विवाह.आयुष्यभर परस्परांस एकनिष्ठ राहून ऐहिक सुख मिळवणे आणि समाजाची कर्तव्ये पार पाडणे ही संकल्पना विवाह संस्थेत अभिप्रेत आहे.त्यामागे निसर्गाच्या ज्ञात अज्ञात शक्तीचे बंधन दोघांवरही राहते.या विवाह संस्था दिवसेंदिवस पावित्र्य राखताना जादा व्यावहारीक होत आहेत.समाजाची वाढती क्लिष्टता,जगण्यासाठी करावी लागणारी धडपड,वेळेचा व पैशाचा अतिरेक,शांततेने विचार करण्याची क्षमता या गोष्टी गूढ होत चालल्याने विवाह संस्था डळमळीत होऊ लागल्या आहेत.योग्य वयात विवाह व्हावेत ही समाजाची अपेक्षा असते.पण आई वडील कामामध्ये व्यस्त असल्याने त्यांच्या व्यस्त कार्यातून मुलांसाठी उपवर स्थळ शोधणे बऱ्याचवेळा अवघड होते.यासाठी वेळ देणे गरजेचा असून याची जाणीव असली तरी मर्यादीत कुटूंबामुळे वेळ काढणे अशक्य झाले आहे.

म्हणून आमच्यासारख्या वधू वर परिचय संस्था स्वेच्छेने हे काम स्वीकारतात.आपल्या जाती-धर्माचे सातत्य टिकावे,त्यातील संस्कार-रितीरिवाज टिकून राहावेत म्हणून आपल्या समाजातील वधू वर शोधून देण्याचे काम आम्ही करतो.वधू वर सूचक मंडळे ही अतिशय निकडीची गरज आहे ही संकल्पना आता लोकांमध्ये रूजत आहे.ज्यामध्ये योग्य ती माहिती दिली जाते.आपल्या पाल्याला मनपसंद जोडीदार हवा हे पाहण्यासाठी परिचय मेळाव्याच्या माध्यमातून व्यासपीठ मिळते. आमच्यासारख्या विवाह संस्थेमध्ये आपल्या जातीधर्माची बरीचशी स्थळे आहेत.ज्यामध्ये त्या व्यक्तीचा फोटो,शैक्षणिक पात्रता,वय,उंची,कौटुंबिक स्थिती,आवड-निवड अशी सर्वच माहिती मिळते आणि दोन्ही पक्षाच्या लोकांची भेट घडवली जाते.परस्परांची माहिती घेता येते.म्हणजे निवड करण्याची सुवर्णसंधी वधू वर सूचक मंडळे देतात.दोघांना जोडीदार निवडायचे पूर्ण स्वातंत्र असते आणि लग्न जुळवण्याचे योग्य व्यासपीठ म्हणजे ह्या विवाह संस्था.

काम,नोकरीधंदा यासाठी एकाच धर्मातील माणसे सर्व बाजूला विखुरलेली असतात.पण या संस्था व त्यांचे मेळावे म्हणजे विवाह इच्छुक तरूणांची पर्वणीच होय.