मासेमारी म्हणजे फिशिंग, हा शब्दश: अर्थ. सध्याच्या इंटरनेट युगात फिशिंग म्हणजे इंटरनेट चा वापर करून कुणा अनोळखी द्वारे फसवणूक होणे / फसवणुकीच्या जाळ्यात अडकणे.
इंटरनेट द्वारे होणाऱ्या हल्ल्या पासून वाचण्यासाठी, आम्ही आमच्या नेटवर्क आणि सिस्टम्स ह्यांचे योग्य प्रकारे संरक्षण करतच असतो, पण हे नेटवर्कद्वारे हल्ला (cyber attacker) करणारे लोक, याना आपण स्कॅमर (scammer) म्हणतो, हे तुमच्या वैयक्तिक मेल बॉक्स मध्ये कोणते मेसेजेस पाठवतात, ह्या वर आमचे काहीच नियंत्रण नसते, कारण तुमचे मेल बॉक्स हे आमच्या नियंत्रणाखाली असत नाहीत.
इंटरनेट द्वारे सगळ्यात सर्रास केला जाणाऱ्या फसवणुकीचा प्रकार म्हणजे फिशिंग, त्या बद्दल इथे माहिती देत आहोत.
सर्व जगाभरामधील संस्था, संघटना किंवा वैयक्तिक रित्या ज्या फसवणुकीला बळी पडतात, ती म्हणजे फिशिंग. फिशिंग हे वेगवेगळ्या प्रकारे जरी होत असले तरी त्या सर्व प्रकारांचा एकच समान उद्देश असतो, तो म्हणजे आपली संवेदनशील माहिती हस्तगत करणे , उदा: पास वर्ड, लॉग इन चे डिटेल्स, क्रेडिट कार्डची माहिती किंवा बँक अकाऊंटचे डिटेल्स, तुम्हाला चुकीच्या खात्याला पैसे देण्यास उद्युक्त करणे इत्यादी.
आता कोण-कोणत्या प्रकारच्या फिशिंग अटॅक पासून आपल्याला सावध रहावे लागणार आहे, ते पाहू या !
फिशिंग : या प्रकारच्या हल्ल्या मध्ये, हल्ला करणारे, ज्यांना हॅकर म्हंटल जात, ते एखाद्या कंपनीच्या नावाने तोतया अकाऊंट तयार करतात व त्या द्वारे आपले लॉग इन डिटेल्स मिळवण्यासाठी, आपल्याला आपल्या बँक अकाऊंटच्या डिटेल्सची सत्यता पडताळणी ( verify) करण्यासाठी एक लिंक पाठवतात. ती वेबसाईट मूळ वेबसाईट सारखीच असते जर आपण अशा वेबसाईटला खरे समजून लॉग इन केले तर आपली लॉग इन डिटेल्स ची माहिती या हॅकरच्या हातात अलगद पडते.
स्पीयर फिशिंग : स्पीयर फिशिंग हा फिशिंग पेक्षा जास्त अत्याधुनिक प्रकार आहे, ज्या मध्ये या हॅकर कडे आपली सगळी संकलित केलेली माहिती असते, ज्या मुळे आपल्याला तो हॅकर हा एक कायदेशीर स्त्रोत आहे असे वाटू शकते. ते आपल्याशी बोलताना किंवा ई मेलच्या मसुदयामद्धे आपल नाव, फोन नंबर किंवा आपण संलग्न असणाऱ्या एखाद्या कंपनीचे नाव घेऊ शकतात, ज्या द्वारे आपल्याला ही ई मेल कायदेशीर वाटू शकते आणि आपण त्यांनी दिलेल्या लिंकवर विश्वास ठेवून क्लिक करतो.
शेअरड डॉक्युमेंट फिशिंग : या मध्ये आपल्याला असा एखादा ई मेल येऊ शकतो, ज्या मध्ये ड्रॉप बॉक्स किंवा गूगल ड्राइव द्वारे एखादे डॉक्युमेंट शेयर केले आहे असे भासवणारी लिंक पाठवली जाते. आपण या लिंक वर क्लिक केल्यास आपल्याला तोतया पेजवर घेऊन गेल जात आणि आपली अकाऊंटची सगळी माहिती चोरली जाते.
या अशा फिशिंग अटॅक पासून वाचण्यासाठी आपण काय काळजी घेऊ शकतो?
त्या साठी पुढे दिलेल्या काही ई मेल प्रॅक्टिसेस आहेत, त्या आपण लक्षात घेऊ या
